Friday, 24 April 2015

शारदे छेड तुझी विना !!धृ.!!

शालेय प्रार्थना




शारदे छेड तुझी विना !!धृ.!!

झंकारातुनी ओसंडू दे सद्वर्तन सद्गुणा

शारदे छेड तुझी विना !!१!!

जिकडे तिकडे उणीव आहे

ओंगळ दुषित जीवन वाहे

संपर्क नको दुर्गुणा !!२!!

शारदे छेड तुझी विना !!धृ.!!

उणीव भेडसवी ही देशाला

सदाचरण सद्वर्तन शीला

मती दे सद्भावना !!२!!

शारदे छेड तुझी विना !!धृ.!!



वंदन शिवतनया

वंदन शिवतनया प्रथम हे !!धृ.!!.... ३ वेळा

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता

कार्यारंभी तूची देवता

नमितो आम्ही तुला प्रथम हे !!१!!

वंदन शिवतनया प्रथम हे !!धृ.!!.... ३ वेळा

आम्ही बालके तुझीच देवा

गोड करुनी घे आमुची सेवा

आशिष देई आम्हा प्रथम हे !!२!!

वंदन शिवतनया प्रथम हे !!धृ.!!.... ३ वेळा

( धृवपद सोडून सर्व ओळी २ वेळा म्हणाव्यात )


विनावादिनी मजला वर दे

विनावादिनी मजला वर दे

सूर स्वरांचा वाक झरा दे !!धृ.!!

पुस्तक बनू दे माझे मस्तक

सर्वही विद्या होवो हस्तक

तुझ्या अक्षरे अक्षय पद दे !!१!!

सूर स्वरांचा वाक झरा दे !!धृ.!!

आई मजला तव संगीत दे

मनात माझ्या मोर नाचू दे

शब्दसुरांचे साज मला दे !!२!!

सूर स्वरांचा वाक झरा दे !!धृ.!!

0 comments:

Post a Comment

Total Pageviews