शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाचा उपयोग
अनुक्रमणिका
[लपवा]शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाचा उपयोग[संपादन]
मागील लेखात आपण तंत्रज्ञानाचा शिक्षणप्रणालीत वापर कशाकरिता करायचा हे समजून घेतले. जगातील संशोधनाचे निष्कर्ष हे दर्शवितात की फक्त तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीतच, कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता, एकाच वेळेस देणे शक्य आहे. तंत्रज्ञानाचा वापर ह्याकरिता कसा करायचा हे आपण या लेखात बघणार आहोत.
तंत्रज्ञान म्हणजे काय ?[संपादन]
तंत्रज्ञान (Technology) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या (Systems) यांचे संकल्पन (Design), निर्मिती आणि उपयोजन (Application) अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्राचीन काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहे. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट इत्यादी तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञानाचा विकास साधला आहे.
तंत्रज्ञान म्हणजे “वैज्ञानिक व इतर सुसंघटीत ज्ञानाचे” प्रत्यक्ष जीवनात आवश्यक प्रात्यक्षित कृतींना सोपं व सहज करण्यासाठीचे उपयोजन. तंत्रज्ञानाच्या मदतीने मानव वेगवेगळे अवजारे व यंत्रे वापरून ह्या प्रात्यक्षित कृती सोप्या व सहज पद्धतीने करतो.
तंत्रज्ञानाचा शिक्षणप्रणालीत वापर म्हणजेच “वैज्ञानिक व इतर सुसंघटीत ज्ञानाचे” अधिक गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक शिक्षणप्रणाली उत्क्रांत करण्यासाठीचे उपयोजन. “वैज्ञानिक व इतर सुसंघटीत ज्ञानात” कौशल्य, अनुभव आणि खूप काही “Common Sense”चा पण अंतर्भाव होतो. तंत्रज्ञानाच्या चांगल्या परिणामकारक वापरात मानव आणि त्याच्या सामाजिक जीवन पद्धतीचा नेहमीच अंतर्भाव असतो.
शिक्षणप्रणालीत, मानव व तंत्रज्ञानाच्या चांगल्या परिणामकारक मिलापाची पद्धत, शिक्षण प्रक्रियेच्या खालील विश्लेषणामुळे आपणास सहज लक्षात येते.
दोन प्रकारच्या शैक्षणिक कृती[संपादन]
कुठल्याही प्रकारच्या शिक्षण प्रक्रियेत खालील दोन प्रकारच्या शैक्षणिक कृतींचा अंतर्भाव असतो:
- आंतरक्रियात्मक नसलेल्या (Non-Interactive) शैक्षणिक कृती: विद्यार्थी ह्या प्रकारच्या कृती स्वतंत्रपणे करू शकतो, जसे पुस्तक वाचणे, टीव्ही / व्हिडीओ कार्यक्रम बघणे, व्याख्यान ऐकणे, निबंध लिखाण करणे, गणित सोडवणे, इत्यादी. आपल्या देशातील शिक्षण प्रक्रियेत प्रामुख्याने ह्या प्रकारच्याच कृतींचा अंतर्भाव असतो. ह्या कृतींमध्ये शिक्षक किंवा इतर विद्यार्थ्याचा कुठलाही वैयक्तिक प्रतिसाद अपेक्षित नसतो. ह्या प्रकारच्या कृती प्रामुख्याने विद्यार्थ्यास फक्त विषयासंबधी माहिती पुरवितात. बहुतेक विद्यार्थ्यास ह्या माहितीला ज्ञानात उत्क्रांत करण्यास, सोबत आंतरक्रियात्मक (Interactive) असलेल्या शैक्षणिक कृतींची आवश्यकता भासते. केवळ ह्याच कारणामुळे, एखादाच एकलव्य शिक्षकाच्या कुठल्याही मदतीशिवाय शिकू शकतो. इतर बहुतेक विद्यार्थ्यास, मानवी शिक्षकाची मदत प्रामुख्याने आंतरक्रियात्मक (Interactive) असलेल्या शैक्षणिक कृतींसाठी अत्यावश्यक असते. आंतरक्रियात्मक नसलेल्या (Non-Interactive) शैक्षणिक कृतींमध्ये, तंत्रज्ञानाचा वापर करून, कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता, एकाच वेळेस देणे सहज शक्य आहे. ह्या प्रकारच्या कृतींसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक साधनांचे विकसन करण्यास सुरवातीला फक्त एकदाच परिश्रम, भांडवल आणि वेळ द्यावा लागतो. विकसित झालेल्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, पुढील प्रतीच्या निर्माण व वितरणासाठी मात्र अत्यल्प खर्च येतो. जसे, विकसित झालेल्या टीव्ही / व्हिडीओ कार्यक्रमाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, पुढील प्रतींच्या निर्माण व वितरणासाठी मात्र अत्यल्प खर्च येतो. पुढील प्रतींची संख्या जशी वाढते तशी त्याच उच्च गुणवत्तेच्या टीव्ही / व्हिडीओ कार्यक्रमाचे निर्मिती मूल्य कमी होते आणि उपलब्धता मात्र वाढते. ह्याचमुळे, जेव्हा खूप मोठी संख्या अपेक्षित असते, तेव्हा उच्च गुणवत्तेच्या प्रथम प्रतीच्या विकसन करण्यास आवश्यक असलेले परिश्रम, भांडवल आणि वेळ व्यवस्थितरीत्या उपलब्ध करून देणे सहज शक्य असते.
- आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृती: ह्या प्रकारच्या शैक्षणिक कृतींमध्ये शिक्षक किंवा इतर विद्यार्थ्याचा वैयक्तिक प्रतिसाद (म्हणजे, जो फक्त त्याच शैक्षणिक कृतीसाठी असतो) अपेक्षित असतो. जसे, व्याख्यान ऐकणे ही आंतरक्रियात्मक नसलेली (Non-Interactive) शैक्षणिक कृती आहे, परंतु व्याख्यानानंतर जेव्हा विद्यार्थी एखादा प्रश्न शिक्षकास विचारतो, ती कृती आंतरक्रियात्मक असलेली (Interactive) होते कारण शिक्षकाचे उत्तर विशिष्ट विद्यार्थ्याने विचारलेल्या विशिष्ट प्रश्नासाठीच असते. आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) कृतींचे अजून काही उदाहरणे खालीलप्रमाणे देता येतील:
- विद्यार्थ्याच्या गृहपाठावर शिक्षकाने दिलेले प्रत्याभरण (Feedback)
- विशिष्ट विषयावर काही विद्यार्थ्यानी चर्चामंचावर (Discussion Forum) केलेली चर्चा
- आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृती: ह्या प्रकारच्या शैक्षणिक कृतींमध्ये शिक्षक किंवा इतर विद्यार्थ्याचा वैयक्तिक प्रतिसाद (म्हणजे, जो फक्त त्याच शैक्षणिक कृतीसाठी असतो) अपेक्षित असतो. जसे, व्याख्यान ऐकणे ही आंतरक्रियात्मक नसलेली (Non-Interactive) शैक्षणिक कृती आहे, परंतु व्याख्यानानंतर जेव्हा विद्यार्थी एखादा प्रश्न शिक्षकास विचारतो, ती कृती आंतरक्रियात्मक असलेली (Interactive) होते कारण शिक्षकाचे उत्तर विशिष्ट विद्यार्थ्याने विचारलेल्या विशिष्ट प्रश्नासाठीच असते. आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) कृतींचे अजून काही उदाहरणे खालीलप्रमाणे देता येतील:
वर नमूद केल्याप्रमाणे, बहुतेक विद्यार्थ्यास माहितीला ज्ञानात उत्क्रांत करण्यास, सोबत आंतरक्रियात्मक (Interactive) असलेल्या शैक्षणिक कृतींची आवश्यकता भासते. पण ह्या कृतींसाठी “खूप मोठ्या संख्येमुळे कमी होत असलेल्या निर्मिती मूल्याचे गणित” लागू होत नाही. ह्यामुळे आंतरक्रियात्मक (Interactive) असलेल्या शैक्षणिक कृती जास्त महागड्या होतात. उच्च गुणवत्तेच्या टीव्ही / व्हिडीओ कार्यक्रमाच्या CD/DVD च्या बहुप्रती करण्यास फारसा खर्च आवश्यक नसतो, परंतु प्रत्येक आंतरक्रियात्मक (Interactive) असलेल्या शैक्षणिक कृतीसाठी मात्र जास्त मनुष्यबळ लागते. ह्यामुळे, आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृतींमध्ये, तंत्रज्ञानाचा वापर करून, उपलब्धता (Access) वाढवता येत नाही, परंतु कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता मात्र शक्य होते.
शैक्षणिक कृतींचा खर्च[संपादन]
आंतरक्रियात्मक नसलेल्या (Non-Interactive) व असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृतींचे शिक्षणप्रणालीतील मिश्रण, प्रत्येक जादा विद्यार्थ्यासाठी येणारा खर्च, कमी किंवा जास्त करीत असतो. जसे,
- शालेय शिक्षणात आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृतींचे प्रमाण “उच्च शिक्षणाच्या तुलनेत” जास्त असते. कारण ज्ञान निर्मितीसाठी, कमी वय व अनुभव असलेल्या शालेय विद्यार्थ्यास, ह्या प्रकारच्या कृती आणि शिक्षकांची मदत जास्त आवश्यक असते. ह्याच कारणामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून सुध्दा, “उच्च शिक्षणाच्या तुलनेत” उपलब्धता (Access) फार वाढवता येत नाही, परंतु कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता मात्र शक्य होते.
- मात्र, उच्च शिक्षणात आंतरक्रियात्मक नसलेल्या (Non-Interactive) शैक्षणिक कृतींचे प्रमाण “शालेय शिक्षणाच्या तुलनेत” जास्त असते. कारण जास्त वय व अनुभव असलेला विद्यार्थी, ज्ञान निर्मितीची जवाबदारी पेलण्यास सक्षम असतो. ह्याच कारणामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून, कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता, एकाच वेळेस देणे सहज शक्य आहे.
वरील विवेचना मुळे आपणास हे सहज लक्षात येईल की “शालेय शिक्षणाच्या” तुलनेत, तंत्रज्ञानाचा वापर “उच्च शिक्षणात” जास्त परिणामकारक असतो.
शिक्षणप्रणालीतील ह्या आंतरक्रियात्मक नसलेल्या (Non-Interactive) व असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृतींच्या मिश्रणाप्रमाणे, तंत्रज्ञान आणि शिक्षकांची सांगड घालणे आवश्यक असते. जसे, “शालेय शिक्षणात” तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृतींसाठी करावा लागतो. परंतु, “उच्च शिक्षणात” मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने आंतरक्रियात्मक नसलेल्या (Non-Interactive) शैक्षणिक कृतींसाठी करावा लागतो. तरच, कुठल्याही शिक्षणप्रणालीत, ज्ञान निर्मितीची अपेक्षित परिणामकारकता साधता येते.
ह्या लेखात, तंत्रज्ञानाचा उपयोग परिणामकारक शिक्षणासाठी कसा करायचा हे आपण समजून घेतले. ह्या लेखमालेतील पुढील लेखात, तंत्रज्ञानावर आधारित प्रमुख दोन प्रकारच्या शिक्षणप्रणालींची ओळख आपण करून घेणार आहोत.
ह्या लेखमालेची आगळी वेगळी वैशिष्टे[संपादन]
ह्या लेखमालेतील प्रत्येक लेखाचे “Online Version” खालील प्रत्येक संकेतस्थळांवर प्रत्येक विद्यार्थ्याकरिता नि:शुल्क उपलब्ध असेल:
वरील प्रत्येक संकेतस्थळ प्रत्येक शिक्षकास “Online Class” निर्माणा करीता पूर्णपणे नि:शुल्क सेवा देते. ह्या “Online Version” खालील सुविधा पुरवतील:
- ह्या लेखाचे पूर्ण शैक्षणिक दृकश्राव्य अनुभव देणारे “SCORM or Video” मधील रुपांतर
- ह्या लेखासंदर्भात, मी आणि जगातील तुमचे इतर मित्र, यांच्यासोबत विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी आणि आपल्या परखड विचारांसाठी “Discussion Forum” आणि थेट तात्काळ चर्चा करण्यासाठी “Chat Room”
- स्वत:च्या आकलनाचा अंदाज घेण्याकरीता स्वयं चाचणी आणि इतर खूप काही
एकदा तरी मित्रांसह आवर्जून अनुभव घेण्याची आग्रहाची विनंती.
0 comments:
Post a Comment