Thursday, 14 May 2015

🐅🐅 संभाजी राजे🐅🐅

🐅🐅 संभाजी राजे🐅🐅


"अाबासाहेब........
रक्ताचा अभिषेक घालुनच स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल , आणि शिवपुत्र अशीच जर मृत्यूशी ओळख होणार असेल, तर रायगडाच्या जगदीश्वराला मी एकच मागणं मागेन, ......." हजारवेळा जन्म दे, पण शिवपुत्र म्हणूनच दे."
"जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलतं........ मरायचं कसं हे मी शिकवेन"
            :-     शंभुबाळ
हे वाक्य उच्चारायच्या वेळी त्यांच वय होतं अवघं ३२. काय अलौकिक विचार.

🐅 शंभुराजांचा जीवनकाळ 🐅

१) १४ मे १६५७ रोजी पुरंदरवर जन्माला असलेले युगंधर म्हणजे शंभुराजा.
२) वयाच्या दुसर्या वर्षी आईविन पोरका झालेलं बाळ म्हणजे शंभुराजा.
३) वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
४) वयाच्या १०व्या वर्षी आग्राच्या भेटिला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभुराजा.
५) वयाच्या ११व्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
६) वयाच्या १३व्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.
७) वयाच्या १४व्या वर्षी बुधभुषन नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडित म्हणजे शंभुराजा.
८) वयाच्या १५व्या वर्षी वेगवेगळ्या भाषेत ३ महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.
९) वयाच्या १६व्या वर्षी १० हजार सैनिकांचे कुशल नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.
१०) वयाच्या १७व्या वर्षी फोंडाकिल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा.
११) वयाच्या १८व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा.
१२) वयाच्या १९व्या वर्षी संतंश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहु ते पंढरपूर हि पहिली वारी करणारा म्हणजे शंभुराजा.
१३) वयाच्या २३व्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छत्रपती म्हणजे शंभुराजा.
१४) वयाच्या २३व्या वर्षापासून ३२व्या वर्षापर्यत एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, मोगल, सिद्दि या ६ सत्ताधीशांशी लढणारा म्हणजे शंभुराजा.
१५) जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट युध्द भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त १ महिन्यात तयार करणारा म्हणजे शंभुराजा.
१६) जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा म्हणजे शंभुराजा.
१७) वयाच्या ३२व्या वर्षी शिवरायांच्या स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान देणारा शुरवीर योद्धा म्हणजे  अापला शंभुराजा.
लढाईत हार नाही, माघार नाही.
युध्दात फक्त जिकणं एवढंच माहिती असणारा असा हा शुरवीर, नरवीर राजा त्यावेळेस फक्त १० वर्ष जरी जगला असता तर आज भारताचा इतिहास वेगळाच असता.


🐅  संभाजीराजांचा पराक्रम  🐅 (थोडक्यात)

१) मराठ्यांनी ओरंगजेबाच्या सैन्याला युध्दात २३ वेळा हरवलं होतं व मुघल साम्राज्यचं अस्तित्व संपवलं.
२) मराठ्यांनी रोहिल्ले सरदारांना ८ वेळा हरवलं.
३) मराठ्यांनी औंधच्या अफगाणांना ४ वेळा हरवलं.
४) मराठ्यांनी म्हैसूरच्या हैदरअलीला ८ वेळा हरवलं व त्याचं अस्तित्व संपवलं.
५) मराठ्यांनी म्हैसूरच्या टिपूसुलतानला ६ वेळा हरवलं व त्याचं अस्तित्व संपवलं.
६) मराठ्यांनी हैद्राबादच्या निजामाला  ३ वेळा हरवलं.
७) मराठ्यांनी इग्रंजाना २ वेळा हरवलं.
८) मोगल, इग्रंज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्दि याच्यांशी एकाच वेळी सलग ९ वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी लढाया लढणारा राजा.
९) त्याच बरोबर ग्ंह कलह (सावत्र अाई, सख्खे मामा), स्वंतःहाच्या मंत्रिमंडळातील मंत्री या सर्वाशी तोंड देत. घोड्यावर रपेट करता करता जेवणारा व दिवसरात्रीतील २४ तासापैकी फक्त ४ तास झोपणारा राजा.

0 comments:

Post a Comment

Total Pageviews