Friday, 15 May 2015

सामाजिक सुसज्जता - परिचय

सामाजिक सुसज्जता - परिचय
सर्व शिक्षा अभियानाची प्रवेश-समता-दर्जा ही उद्दिष्टये साध्य करण्यासाठी समाजाचा सक्रीय सहभाग, महत्वाची भूमिका बजावतो. शालेय व्यवस्थापनात सामाजिक सहभागातून सामाजिक, धार्मिक तसेच लिंगाधारित विषमता दूर करणेही सोपे होऊ शकेल. नागरिकांना माता-पिता अथवा पालक म्हणून शाळेच्या विकासात हातभार लावायचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. शाळेच्या विकासात तसेच क्षमता वर्धनात सामाजिक सहभागाची भूमिका आणि महत्व शालेय शिक्षकांना उमजावे, या दृष्टीने राज्य शासनाची भूमिका नेहमीच स्वागतार्ह राहिली आहे.

अगदी सुरूवातीपासून पुढीलप्रमाणे काही पावले उचलून राज्य शासनाने समाज-सहभागाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
  • ‘शिक्षा का हक’ अभियानांतर्गत समानतेच्या मुद्दयासंदर्भात सामाजिक समावेशासह चैतन्य आणि जागृती निर्माण करण्याचे राज्य शासनाव्दारे प्रस्तावित
  • विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि नियमित हजेरी यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी शाळा आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून अनवाणी समुपदेशकांची योजना
  • NPEGEL अंतर्ग आदर्श समुह तसेच अल्पसंख्यक बहुल जिल्ह्यांमध्ये (विशेषतः) माँ-बेटी मेळावे आयोजित करणे
  • शिक्षण प्रक्रियेतील साथिदार म्हणून समाजाला समाविष्ट करताना क्रीडा, कला, हस्तकला अशा बाबींचा संकल्पनाधारित समावेशक आणि शिक्षण आनंदपूर्ण प्रक्रिया करण्याचे प्रयत्न.

0 comments:

Post a Comment

Total Pageviews