Friday, 15 May 2015

दर्जा - संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीचा लेखाजोखा घेताना संशोधन,

दर्जा - संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख
सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीचा लेखाजोखा घेताना संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. नागरी कामे, शिक्षक प्रशिक्षण अशा विविध कामांवर सर्व शिक्षा अभियानांतर्गत देखरेख ठेवावी लागते, त्यांचे मूल्यमापन करावे लागते. आवश्यक तेथे मध्यावधी मूल्यमापन आणि प्रत्याग्रहणाच्या आधारे फेरविचारही करावा लागतो. त्याचमुळे या कार्यक्रमात अध्ययनाचा उच्च दर्जा आणि योग्य अंमलबजावणी यांची खातरजमा करण्यासाठी हस्तक्षेप करणे आवश्यक ठरते.

संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख अशी अनेक कामे सरकारने हाती घेतली आहेत. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
  • DISE आणि शालेय विकास आराखडया संदर्भातील माहितीचे संकलन आणि अनियमितता तपासणी
  • DISE आणि SDP माहितीची 5% नमूना तपासणी
  • गृह सर्वेक्षण
  • ग्रामीण शिक्षण नोंदींची देखभाल
  • नागरी कामांचे तृतीय पक्षामार्फत मूल्यांकन
  • विविध व्यवधानांशी संबंधित कृती प्रवण संशोधन प्रकल्प राबवणे.
  • अध्ययन विकासाची ठरावीक कालावधीनंतर देखरेख
  • SCERT, TBB अथवा खाजगी सेवाभावी संस्थामार्फत शिक्षणशास्त्र संशोधन अभ्यास राबवणे.
  • सातत्यपूर्ण, एकात्मिक मूल्यमापनासंदर्भात चर्चासत्रे आयोजित करणे
  • संशोधनातून प्राप्त माहितीच्या आधारे कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे तसेच संशोधनातील साधितांची देवाणघेवाण करणे.

0 comments:

Post a Comment

Total Pageviews