Saturday, 13 June 2015

सुख दु:ख

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहीतरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सुख आणि दु:ख वेडी अवंतिका
उगवले आहे इथे हे झाड पाण्याचे
आसवांनी तीच वेडी सांडते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सुख आणि दु:ख वेडी अवंतिका

0 comments:

Post a Comment

Total Pageviews