चला ...रायगडला... अभयारण्य, लेणी अन् माथेरान पहायला...
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर
पसरलेला रायगड जिल्हा कोकणाचा एक प्रमुख भाग आहे. राजधानी मुंबई पासून 120
कि.मी.अंतरावर असलेला रायगड जिल्हा कोकण विभागीय महसूल क्षेत्रात येतो.
जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 7162 चौ.किमी आहे. उत्तरेला ठाणे व
वायव्येला मुंबई हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून
दक्षिणेस असलेल्या सावित्री नदीने रत्नागिरीपासून रायगड जिल्ह्याची दक्षिण
सीमा निश्चित केली आहे. जिल्ह्याची पूर्वेकडील सीमा सह्याद्री पर्वताच्या
लहान मोठ्या रांगांनी वेढलेली असून त्याला लागून पुणे जिल्ह्याची हद्द सुरु
आहे. पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, मुरुड,
अलिबाग, पेण, सुधागड-पाली, खालापूर, कर्जत पनवेल, उरण अशा पंधरा
तालुक्यांचा हा जिल्हा आहे.
कोकण रेल्वेमुळे रायगडच्या आर्थिक प्रगतीला
अधिक वेग आला. अलिबाग येथील आरसीएफ कंपनी, पनवेल व महाड येथील औद्योगिक
वसाहत, पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांमुळे
येथील अर्थकारणाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला
आहे. रायगड जिल्ह्यातून मासे आणि कोळंबी, गणपतीच्या मूर्ती परराज्यातही
जातात. पेण तालुक्यात गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा उद्योग विकसित होत आहेत.
नव्या पिढीचा कल सामूहिक शेतीकडे असल्याने कृषी क्षेत्रातील आधुनिक
प्रकारचे प्रयोग जिल्ह्यात केले जात आहेत. मात्र पर्यटन हा जिल्ह्याच्या
अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे. गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय वेगाने
विस्तारला आहे. हा विस्तार लक्षात घेता शासनातर्फे पर्यटनस्थळांचा विकास
करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारा हा
जिल्हा निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करीत प्रगतीच्या वाटेवर वेगाने पुढे
जाण्यास सज्ज झाला आहे. तर पाहुयात रायगड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळे...
webduniya.com
0 comments:
Post a Comment