समर्थांचा महायोगी
| |
परब्रह्मरूपी कोमल वेल वर जात आहे. त्या वेलीला मायारुपी फळ लागले आहे. त्या फळामध्ये वेलीचे बीज आहे. त्या बीजापासूनच तर वेल रुजली आहे. ते बीज आदिअंती एकच नाही का? पण हा महायोगी मायारूपी फळाचे बीजच नरदेहाच्या साहाय्याने जाळून टाकतो. ह्या योग्यांना 'कान्ता, पुत्र, धन वैभव, स्वजन' काही आवडत नाही. केवळ रामाचे दासय्त्व तेवढे आवडते. त्याचाच त्यांना आनंद. तो आनंद ते स्वत: लुटतात व मुक्त हस्ताने लोकांना वाटतात. अशाप्रकारे ते मायेचा सर्वसंग परित्याग करतात. असे हे महायोगी. त्यांच्या ठिकाणी अज्ञानाचा लेशही नसतो. ते अद्वैतबोधात नांदत असतात व सर्व विश्व आत्मवत पाहातात. त्यांनी विकारांवर जय मिळविलेला असतो. त्यांना प्रापंचिक उपाधी बाधतच नाही. 'प्रापंचिक नाही जयाते उपाधी।' असे निरुपाधिकपणे ते ह्या दृश्य जगताकडे पाहातत. तेच त्यांचे खरे भाग्य म्हणूनच ते खरे महायोग होत.
0 comments:
Post a Comment